Ghatkopar Crime News : गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुलांचे अपहरण होत असल्याचे बनावट मॅसेज समाज माध्यमांवर (Social Media) व्हायरल होत आहे. याचा परिणाम आता लहान मुलांवर देखील होताना दिसत आहे. मुंबईतल्या (Mumbai) घाटकोपर (Ghatkopar) इथं एका ११ वर्षाच्या मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. अपहरणकर्त्याच्या तावडीतून आपण कसे सुटलो, अशी माहिती त्याने कुटुंबीयासह पोलिसांना दिली. (Ghatkopar News Today)
अचानक घडलेल्या या घटनेने सारेच अचंबित झाले. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा बिंग फुटले. चित्रपटात शोभावा असा प्रकार बुधवारी घाटकोपर पोलिसांनी उघडकीस आणला. घाटकोपर येथील अशोकनगर परिसरात राहणाऱ्या या ११ वर्षीय मुलाला कमी मार्क्स पडले होते. त्यामुळे शाळेत पडणारा ओरडा त्याला नको होता.
अशातच मोठ्या भावाच्या मोबाईलवर त्याने अपहरणाचे फेक म्यासेज पाहिले होते. मग काय त्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. शाळेत जात असताना रिक्षातून आलेल्या दोन जणांनी माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी माझे तोंड दाबले. मात्र, मी रिक्षातून उडी मारली आणि त्यांच्या तावडीतून कसाबसा सुटलो, अशी बनावट कहाणी या मुलाने आपल्या आई-वडिलांना सांगितली. (Mumbai News Today)
मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने आई-वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात आल्यानंतरही या मुलाने आपली बनावट कहाणी पोलिसांना सांगितली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांनी तात्काळ पथके तयार करून या रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले.
पोलिसांनी तपास करत परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं पोलीस उघड झालं. दरम्यान, पोलिसांनी या मुलालाच विश्वासात घेऊन विचारले असता, आपणच हा खोटा बनाव रचला असल्याची कबूली त्याने दिली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.