doctor death due to heart attack  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : धक्कादायक! पुण्यात तरुण डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कारच्या ड्रायव्हिंग सीटवरच सोडला जीव

Rohini Gudaghe

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पुण्यामध्ये एका तरूण डॉक्टरचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. पुण्याच्या वानवडीमध्ये तरुण डॉक्टरचा हृदयविकाऱ्याच्या झटक्याने चारचाकीतच मृत्यू झाल्याची घटना घडली. काल २२ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वानवडीमध्ये काल २२ ऑगस्ट रोजी दुपारी चारचाकी गाडीत अनुप रॉय (वय ३८,रा. साहिल प्राईड सोसायटी, कामठे पाटील नगर, येवलेवाडी) या तरुण डॉक्टरचं हृदयविकाराने निधन (Pune News) झालंय. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडीतील परमार पार्क सोसायटी समोर चारचाकी गाडी चालू असताना त्यामधील व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडली होती.

गाडीतच पडले बेशुद्ध

आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क केला. त्यानंतर घटनास्थळावरून पोलीस गाडीत बेशुद्ध पडलेल्या डॉक्टरला रुग्णालयमध्ये घेऊन (doctor death due to heart attack) गेले. त्यावेळी ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी गाडीत सापडलेल्या कागदपत्राद्वारे त्यांच्या पत्नीला संपर्क केला. या पार्श्वभूमीवर रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टरच हृदयाच्या समस्येचा बळी ठरला आहे, त्यामुळे काळजी निर्माण होणं स्वाभाविकच (what is heart attack) आहे.

पुण्यातील धक्कादायक घटना

रॉय यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, या तरूण डॉक्टरला गेल्या चार ते पाच वर्षांपासून उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होता .अगदी कमी वयात तेही डॉक्टरचे हृदयविकाराने निधन झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी हळहळ ( heart attack symptoms) व्यक्त केलीय. मागील काही वर्षांमध्ये तरुणांना नाचताना, खेळताना किंवा चालताना हृदयविकाराचा झटका येऊन जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT