Shabana Azmi Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Shabana Azmi Latest News: लुटने वाला जाएगा, नया जमाना आयेगा: शबाना आझमी

लुटने वाला जाएगा, नया जमाना आयेगा: शबाना आझमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shabana Azmi Latest News: 'कमाने वाला खायेगा, लुटने वाला जाएगा, नया जमाना आयेगा', असं ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी म्हणाल्या आहेत. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव यशस्विनी सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

शबाना आझमी म्हणाल्या की, ''माझी काय हिम्मत की मी या महिलांना पुरस्कार देऊ? उलट मला यांचा हस्ते पुरस्कार मिळावा.'' त्या म्हणाल्या, शरद पवार यांनी महिला सशक्तीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. आज किती लोक महिला सक्षमीकरण बाबत बोलतात. मात्र ते जे बोलतात ते पाळतात का, ते आपण पहातोच.

याच कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर म्हणाले की, ''हा मातृसत्ताक पद्धती येण्याचा काळ आहे.'' ते म्हणाले, ''आपण आपल्या मुलींना असं वाढवत नाही की, त्या समाजाचा सामना करायला तयार होतील. त्यामुळे मुलींची ताकद वाढत नाही. मग तक्रार करून काय उपयोग? सासरी अन्याय झालेल्या मुलीसाठी नवरा सासरा नव्हे आई वडील जबाबदार आहेत.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''आईचा आदर करा, ती देवी आहे असं सांगितलं जात. मग वडिलांनी काय केले आहे? हे चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्ती बाबत आदर असायला हवा.''

जावेद अख्तर, ''आजपर्यंत एकही बाई आपल्या सासूपेक्षा चांगल जेवण बनवू शकलेली नाही. माझ्या आई सारखं झालं नाही म्हणतात. भारतातच जेवणाचं स्टँडर्ड किती खाली जातंय बघा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT