Devendra Fadanvis News: होय, मोदींनीच कोरोनाची लस तयार केली... फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadanvis On Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल बुधवारपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
Devendra Fadanvis on Uddhav Thackeray
Devendra Fadanvis on Uddhav ThackeraySaam TV
Published On

Maharashtra Politics News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल बुधवारपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ९ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भाजपकडून महाजनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या दौऱ्यानिमित्त आज कराडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाबद्दल माहिती देताना विरोधकांवर हल्लाबोल केला.

Devendra Fadanvis on Uddhav Thackeray
Darshana Pawar Death Case: 'राहुलला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर...', दर्शना पवारच्या कुटुंबीयांची संतप्त प्रतिक्रिया

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस..

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत भाजपच्या (BJP) महाजनसंपर्क अभियानाची सभा कराडमध्ये पार पडली. या सभेला प्रदेशाध्यक्ष विक्रम पावसकर भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

"मोदींनी या देशामध्ये कोरोनोची लस तयार केली. असं मी परवा म्हणलेल उद्धवजींना फार झोंबल असे म्हणत मी तर म्हणेन होय मोदींनी लस तयार केली त्याच कारण असं आहे. जगात पाच देश लस तयार करु शकले. कारण मोदींच्या संबंधामुळे आपल्याला रॉमटेरियल मिळालं," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis on Uddhav Thackeray
Pandharpur Ashadhi Wari : इवलीशी पावले चालती पंढरीची वाट! ११ महिन्यांची चिमुकली राधा विठुरायाच्या भेटीला; VIDEO पाहायलाच हवा..

मोदींमुळेच लस तयार...

याबद्दल पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी "जे शास्त्रज्ञ लस तयार करत होते. मोदीजी त्यांच्याकडे गेले. त्यांना मोदींनी १८०० कोटी रुपये दिले. कोरोनाची लस तयार झाली. त्यानंतर भारतातील १४० कोटी लोकांना मोदी यांनी मोफत लस देण्याचे काम केले. महाराष्ट्रात साडेसतरा कोटी मोफत लसी मोदी यांनी दिल्याचे सांगितले.

महाविकास आघाडीवर टीका...

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकालावरही खोचक टीका केली. "अडीच वर्षे दुसरं सरकार होत, त्यांनी सातारा जिल्ह्यातील योजनांना एक पैसा सुध्दा दिला नाही, मी ज्या अवस्थेत काम सोडून गेलो त्या अवस्थेतच सर्व काम आहेत अडीच वर्षे काहीच झालं नाही, "अशी टीका त्यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com