Pune Dahihandi Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात डीजे अंगावर पडून महिलेचा मृत्यू, दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं

Pune Dahihandi: पुण्यात दहीहंडी उत्सवादरम्यान भयंकर घटना घडली. डीजे अंगावर पडून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Priya More
  • पुण्यात दहीहंडी कार्यक्रमात भयंर घडलं

  • डीजे अंगावर पडून महिलेचा मृत्यू

  • पिंपरी चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात घडली घटना

  • डीजे रॅक लावताना अचानक कोसळला

  • या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पुण्यामध्ये डीजेला विरोध होत असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये याच डीजेने एका महिलेचा बळी घेतला आहे. डीजे अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात ही घटना घडली. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. ऐन उत्सवात महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी डीजेचा रॅक उभारण्यात येत होता. हा रॅक अचानक कोसळला. यामधील डीजे एका महिलेच्या अंगावर पडला. डीजे अंगावर पडल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.

दहीहंडीच्या आयोजनकांनी वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका यांची परवानगी घेतली होती का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दहिहंडीच्या आयोजनक आणि डीजे मालकाविरोधात पोलिस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे राहिल. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे पोलीस दलात 19 जणांची भरती; 5 टक्के आरक्षणाचा गैरफायदा

Traditional Vati Mangalsutra: मराठमोळ्या लूकवर उठून दिसेल पारंपरिक वाटी मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाईन्स

Shahi Paneer: रेस्टॉरंटसारखी मलाईदार आणि स्वादिष्ट शाही पनीर बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Cucumber Benefits : वजन कमी करण्यापासून शुगर कंट्रोलपर्यंत; काकडीमध्ये दडलंय आरोग्याचं गुपित, वाचा ५ जबरदस्त फायदे

Bank Strike: 11 सप्टेंबरला बँका बंद राहणार? देशभरातील ग्राहकांसाठी मोठी बातमी!

SCROLL FOR NEXT