Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: दिवाळीच्या खरेदीसाठी गेल्या पण बोनस झाला चोरी; पुण्यातील मार्केटमध्ये चोरट्यांचा प्रताप

Pune News : दिवाळी खरेदीनिमित्ताने डीमार्टमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे. याचा फायदा चोरट्याने घेतला आहे

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
: दोवाळीनिमित्ताने कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. या बोनसमध्ये दिवाळीची (diwali) खरेदी जाते. पगारात बोनस मिळाल्यानंतर बोनसची मिळालेली रक्कम घेऊन खरेदी करायला गेलेल्या महिलेची (Pune) खरेदी करण्यापूर्वीच बोनस चोरीला गेला आहे. यामुळे दिवाळी खरेदी होऊ शकली नाही.  (Latest Marathi News)

दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन महिलांची पुण्यातील कर्वेनगर भागात असणाऱ्या डी मार्ट कर्वेनगर (वारजे नाका ) येथून पाकीट चोरी (Theft) झाल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला होता. कर्वेनगर येथील रहिवासी असलेल्या तृप्ती वाळूंजकर मुलीसोबत दिवाळीची खरेदी करण्यासाठी रात्री डीमार्टमध्ये आल्या होत्या. करंदी करण्यासाठी दोघी आतमध्ये प्रवेश केला. परंतु दिवाळी खरेदीनिमित्ताने डीमार्टमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे. याचा फायदा चोरट्याने घेतला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लॉक केलेली पिशवीचा लांबविली 

घरून आणलेल्या पिशवीमध्ये पाकीट ठेवून ती पिशवी डिमार्ट'च्या कर्मचाऱ्यांकडून लॉक करून घेतली होती. मात्र आतमध्ये खरेदी करत असताना ट्रॉलीमधून पिशवी चोरट्यांने पळवली. दूसरी महिला मोनिका परदेशी यांची देखील पर्स चोरी झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. वारजे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT