pune university Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Collages News : पुण्यातील महाविद्यालयांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नेमकं कारण काय?

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पूर्वसूचना देण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील मार्गदर्शनाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्याची गरज आहे. मात्र, याच बाबतीत पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच महाविद्यालये नापास झाली आहे.

११९२ महाविद्यालयांनी अजूनही समान संधी केंद्र स्थापन केले नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पूर्वसूचना देण्यात आली आहे. (Maharashtra News)

या केंद्रासंदर्भात समाजकल्याण विभागाने जानेवारी २०२२ मध्ये निर्देश दिले होते. जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांसह कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनीही आजवर एकही समान संधी केंद्र स्थापन केलेले नाही.  (Latest Marathi News)

काय आहे समान संधी केंद्र?

महाविद्यालयांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या निवारणासाठी महाविद्यालय स्तरावर असे केंद्र स्थापन करण्याचे समाज कल्याण विभागाने सांगितले आहे. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन करण्यात यावी तसेच याला विभाग प्रमुख सदस्य सचिव असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोकलमधून ट्रॅकवर पडलेल्या 24 वर्षीय तरुणीचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Women Success Story : पतीची साथ सुटली, वडिलांची सावली हरपली; मुलीसाठी लढली अन् पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Chivda Vs Murmura: चिवडा की मुरमुरा, वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

परळी ते शेगाव, मालेगाव ते म्हाडा अन् रामटेक ते बारामती; राज्यातील दुष्काळाची स्थिती काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Purandar Fort : ४,४७२ फूट उंचीवर वसलेला भव्य पुरंदर किल्ला, गडाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT