Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: हाैस जीवावर बेतली; भीमा नदीत बुडालेल्या २ मुलांचा मृतदेह सापडला

Shirur News: यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती.

रोहिदास गाडगे

Pune News Today: पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही घटना २१ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) आणि अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी त्यांची नावे असून ही मुले कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ढेरंगे वस्ती येथे वास्तव्यास होती. अखेर या दोघांचे मृतदेह सापडले आहे. (Breaking Marathi News)

रविवारी दुपारच्या सुमारास काही मुलं भीमा नदीत पोहण्यास गेली होती. यावेळी गौरव आणि अनुराग यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत पोहणाऱ्या इतर मुलांनी अनुराग आणि गौरवला पाण्यात बुडाल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारी शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीने नदीकाठी धावत घेतली. (Latest Marathi News)

त्यांनी या घटनेची माहिती शिक्रापूर पोलीस, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक,पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी पुणे (Pune) महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाचे केंद्र अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नादरम्यान या दोघांचा मृतदेह सापडला आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

SCROLL FOR NEXT