Pune Hadpasar police station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : दहशत माजविणाऱ्यांच्या कोयता गँगमधील तिघांना पोलिसांनी फिल्मी स्टाइल पकडले

पोलिसांनी उसाच्या फडातून पसार झालेल्या दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune Crime News : हडपसर आणि इतर भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी उसाच्या फडातून पसार झालेल्या दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. तसेच, कोयता गँगमधील आणखी एकाला नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून अटक केली. (Latest Marathi News)

कोयता गँगचा म्होरक्या स्वप्नील उर्फ बिट्ट्या संजय कुचेकर (वय २२, रा. मांजरी, हडपसर), पंकज गोरख वाघमारे (वय २८, रा. बंटर स्कुलजवळ, हडपसर), सत्यम विष्णू भोसले (रा.हडपसर)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मांजरी परिसरात तीन जानेवारी रोजी दरोडा आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिट्ट्या कुचेकर आणि पंकज वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. दोघेजण शिरुर (Shirur) तालुक्यातील पाबळ गावात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांचे (Police) एक पथक पाबळला गेले. पोलिसांना पाहताच कुचेकर आणि वाघमारे उसाच्या फडातून पसार झाले. परंतु पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले. तसेच, कोयता गँगमधील सत्यम भोसले याला पोलिसांच्या पथकाने नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calculator Tips: कॅल्क्युलेटरमधील CE आणि AC बटणांचा अर्थ काय? तुम्हाला माहीत आहे का?

Maharashtra Live News Update: नवी मुंबईतील खारघरमध्ये सापडल्या पैशाने भरलेल्या बॅगा

Pani Puri Recipe : घरीच बनवा बाजारात मिळतात तशा टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, रेसिपी आहे खूपच सोपी

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

SCROLL FOR NEXT