Pune Local Mega Block Sunday10 Dec 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Pune Local Mega Block: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज दिवसभर रेल्वेचा मेगाब्लॉक; पुणे- लोणावळा लोकल रद्द; वाचा सविस्तर..

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे| ता. १० डिसेंबर २०२३

Pune Railway Mega Block:

पुणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी. आज रविवार( १०, डिसेंबर) रोजी पुणे ते लोणावळा मार्गावर रेल्वेचा मेगा ब्लॉक राहणार आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान आज दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Pune Railway Mega Block)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे ते लोणावळा (Pune- Lonavala) दरम्यान आज (रविवार, १० डिसेंबर) दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक राहणार आहे. त्यामुळे लोणावळा पुणे मार्गावर धावणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून हा मेगाब्लॉक (Mega Block) असेल.

त्यामुळे पुण्यातून लोणावळ्याकडे जाणाऱ्या सात लोकल (Pune Local) बंद राहतील. या सातही लोकलच्या एकूण चौदा फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून ते सांयकाळी सहा वाजेपर्यंत या गाड्या बंद असतील.

'मुंबई'तही मेगा ब्लॉक

मुंबईची (Mumbai) जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेचा आज मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी मुंबई लोकलच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (जाणून घ्या मुंबईमधील लोकलच्या मेगाब्लॉकबद्दल सविस्तर)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT