Sawai Gandharva 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Sawai Gandharva 2024: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पुण्यात विशेष बस धावणार, जाणून घ्या मार्ग

PMPML Bus For Sawai Gandharva Program: पुण्यामध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला सुरूवात झाली आहे. या महोत्सवातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी पीएमपीकडून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

Priya More

आर्य संगती प्रसारक मंडळाद्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पीएमपीने आजपासून ते २२ डिसेंबरपर्यंत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथून विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या श्रोत्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी पीएमपीकडून २५ टक्के जादा तिकीट दर आकारला जाणार आहे. १८ ते २० आणि २२ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटतील. तर २१ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटणार आहेत.

तसंच, स्वारगेट मेट्रो स्थानक ते मुकुंदनगर अशी देखील बससेवा असणार आहे. त्याचा तिकीट दर १० रुपये असणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या विशेष बस सेवा कोण-कोणत्या मार्गावर धावणार आहेत याची देखील माहिती समोर आली आहे.

विशेष बसचे मार्ग -

मुकुंदनगर ते निगडी भक्ती शक्ती – दांडेकर पूल, डेक्कन, वाकडेवाडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड स्टेशन.

मुकुंदनगर ते धायरी मारूती मंदिर – दांडेकर पूल, विठ्ठलवाडी, आनंदनगर, वडगाव फाटा, धायरी गाव.

मुकुंदनगर ते कोथरूड डेपो – टिळक रोड, डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, जयभवानीनगर, वनाज कंपनी.

मुकुंदनगर ते वारजे माळवाडी – डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, कोथरूड स्टॅण्ड, गांधी भवन, कर्वेनगर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT