Sharad Pawar-Dilip Walse Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठरलं! अमोल कोल्हेंसाठी शरद पवारांची फिल्डिंग; दिलीप वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात घेणार सभा

Pune News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवार गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली असून २१ फेब्रुवारीला दिलीप वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.

रोहिदास गाडगे

Maharashtra Politics:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असून शरद पवारांचे अनेक विश्वासू साथीदार सध्या अजित पवारांसोबत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवार गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली असून २१ फेब्रुवारीला दिलीप वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गट पडल्यानंतर शरद पवारांची शिरुर लोकसभा मतदार संघात २१ फेब्रुवारीला तिसरी सभा होत असून ही सभा सहकारमंत्री दिलीप वळसेपाटलांच्या होमपिचवर होत आहे. सध्या अजित पवार गटात असलेल्या दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटलांच्या होम पिचवर कोल्हेंच्या पाठीमागे ताकद उभी करण्यासाठी शरद पवार यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे.

ठरलं, तोफ धडाडणार.. मी येतोय ...! हि टँगलाईन देऊन शिरुर आंबेगाव (Shirur Ambegaon) मतदार संघात येत असल्याचा संदेश शरद पवारांकडून दिला जातोय. शिरुर लोकसभा मतदार संघात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) लढणार हेच निश्चित असताना शरद पवारांनी खासदार कोल्हेंसाठी चांगलीच फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे.

शरद पवार वळसे पाटलांच्या मतदारसंघात तिसरी जाहीर सभा घेत जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते शिरुर आंबेगावातील सभेतून कोल्हेंच्या पाठीमागे मोठी ताकद उभी करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सभेतून शरद पवार कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT