PM Modi News Saam TV
मुंबई/पुणे

Savitribai Phule Pune University : PM मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जोरदार राडा; दोन गट भिडले

Pune Latest News: पुणे विद्यापीठ परिसरात डाव्या संघटना आणि भाजप कार्यकर्ते आमने- सामने आल्याने मोठा गोंधळ झाला.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Pune Breaking News:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकुर लिहल्याचा प्रकार समोर आला. या घटनेने युवा भाजप मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी सावित्री बाई फुले विद्यापीठात काही विद्यार्थी संघटनेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटाचे विद्यार्थी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू केले.

काही दिवसांपासून विद्यापीठात अशा घटना वारंवार घडत आहेत. समविचारी संघटना एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहित आहेत, विद्यापीठात JNU ची पुनरावृत्ती घडविण्याचे काम काही संघटना करत आहेत. असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी डाव्या संघटना आणि भाजप कार्यकर्ते आमने- सामने आल्याने मोठा गोंधळ झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलनकर्त्या भाजपकार्यकर्त्यांनी डाव्या संघटनांचा असलेला लाल झेंडा पायाखाली टाकून निषेध केल्याने दोन्ही गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला तर डाव्या संघटनांकडूनही इंकलाब जिंदा बादच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, एकमेकांविरोधातील घोषणाबाजीने परिसरात विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. पोलिसांनी हस्तक्षेप केला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane crime : ठाण्यात गुंडाची दहशत, प्रसिद्ध डॉक्टरच्या दवाखान्याची तोडफोड, व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update : - नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Poha Ladoo Recipe : वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर हिना खान भडकली, फरहाना भट्ट नेमकं काय म्हणाली?

Sangli Accident : कारने बाईकला चिरडलं, आजी-आजोबा अन् नातवाचा जागीच मृत्यू, सांगलीत भयानक अपघात

SCROLL FOR NEXT