Rupali Chakankar Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Rupali Chakankar : महिलांवरील अत्याचार थांबेना, रुपाली चाकणकरांची तातडीने हकालपट्टी करा; पुण्यातील महिला आक्रमक

Rupali Chakankar Latest News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी पुण्यातील महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

मागील काही महिन्यांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलापूर येथील घटनेनं अख्या महाराष्ट्राला हादरवून टाकलंय. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या पीडितांना न्याय मिळवून देण्याचे सोडून बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पुण्यातील महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आलाय.

या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देखील देण्यात आले. राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या (Crime News) आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह आणि बेताल वक्तव्य करत असल्याचं निवेदनात म्हटलंय.

बदलापूर, लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांत झालेल्या महिला आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे. अशा वेळी पीडित कुटुंबीयांना आधार देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मात्र पीडित कुटुंबियांनीच मुलींकडे लक्ष द्यावे, अशी वक्तव्य केलेली आहेत.

ही बाब अत्यंत धक्कादायक आणि निंदाजनक असल्याने चाकणकर यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी, तसेच राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर महिला अधिकारी कार्यरत असताना या घटनांकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हे अशोभनीय आहे, असंही निवेदनात म्हटलंय.

मुख्य सचिव आणि महासंचालकांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेत, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, याबाबतची श्वेतपत्रिका तात्काळ जाहीर करावी, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या हकालपट्टीवरून शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT