Diljit Dosanjh Saam Tv
मुंबई/पुणे

Diljit Dosanjh Concert: गायक दिलजीत दोसांझचा पुण्यात म्युझिक कॉन्सर्ट, चंद्रकांत पाटील यांचा विरोध; कारण काय?

Pune Diljit Dosanjh Concert: दिलजीत दोसांझचा लाईव्ह शोला विरोध करत स्थानिक नागरिकांनी आज आंदोलन केले. ⁠सेव्ह कोथरूड असे फलक स्थानिक नागरिकांनी झळकावले.

Priya More

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा पुण्यामध्ये म्युझिक कॉन्सर्ट होणार आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये आज संध्याकाळी दिलजीत दोसांझचा लाईव्ह शो होणार आहे. ⁠कोथरूड परिसरातील काकडे फार्मवर हा कॉन्सर्ट होणार आहे. पण या कॉन्सर्टला भाजपचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील, स्थानिक रहिवाशांनी आणि मनसेने विरोध केला आहे. यासाठीच शो होणाऱ्या मैदानाच्या बाहेर स्थानिकांनी आंदोलन केले.

दिलजीत दोसांझचा लाईव्ह शोला विरोध करत स्थानिक नागरिकांनी आज आंदोलन केले. ⁠सेव्ह कोथरूड असे फलक स्थानिक नागरिकांनी झळकावत काळ्या फिती बांधत हा शो होऊ नये अशी मागणी केली. या शोमध्ये मद्य विक्री देखील केली जाणार असून यामध्ये विक्रीला इथं परवानगी कशी दिली जाते असा सवाल देखील या स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

या कार्यक्रमासाठी कमीतकमी ८०-१०० स्पीकरच्या भिंती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे राहणाऱ्या वयोवृध्द नागरीकांना याचा त्रास होईल म्हणून आम्ही या शोला विरोध करत असल्याचे इथल्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलं. तर विजयाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार चंद्रकांत पाटील यांनी हाती धुरा घेतली आहे.

दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांनी विरोध केला. फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही तर हा कार्यक्रम देखील रद्द करा, अशा सुचना चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलिस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग, आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला विरोध करत त्यांनी हा कार्यक्रम होऊ नये यासाठी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाफेड-एनसीसीएफचा कांदा चेन्नईकडे रवाना; मनमाडहून रेल्वेने लोडिंग सुरू

High Cholesterol Warning Sign: जर शरीराच्या या 3 भागांत भंयकर वेदना होत असतील तर व्हा सावध; कोलेस्ट्रॉल वाढल्याचे आहेत संकेत

Side Effects of Pomegranate: आरोग्यासाठी फायदेशीर डाळिंब पण ‘या’ ५ लोकांनी चुकूनही खाऊ नये; शरीराचे होऊ शकते नुकसान

Nepal Flood: '२० मिनिटांत पाणी पोहचेल ', नेपाळमध्ये पुन्हा महापूर येणार; ५ पट धोका वाढला, प्रशासनाकडून अलर्ट जारी

School Admission Age: मुलांना शाळेत कधी पाठवावं? योग्य वय ठरवताना लक्षात ठेवा ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT