VIDEO: पुणेकरांना सावधान! खाकी वर्दी घालून तरुणांना मारहाण, तोतया पोलिसाला अटक
Fake Police Arrested By Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: पुणेकरांनो सावधान! खाकी वर्दी घालून तरुणांना मारहाण, तोतया पोलिसाला अटक

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामधून एका तोतया पोलिसाला अटक करण्यात आली आहे. टीम इंडियाने (Team India) टी-२० सामना (T-20 World Cup) जिंकल्यानंतर पुण्यामध्ये तरुणांनी एकच जल्लोष केला. अशामध्ये खाकी वर्दी घालून आलेल्या एका तरुणाने जल्लोष करणाऱ्या तरुणाना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ शोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या तोतया पोलिसाला पुणे पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खाकी वर्दी घालून पोलिस असल्याची बतावणी करत पुण्यामध्ये एका तरुणाने काही तरुणांना मारहाण केली होती. सुशांत पार्टे असं या तोतया पोलिसाचे नाव आहे. सुशांत मूळचा रायगडचा राहणारा आहे. त्याला पुण्याच्या फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. या तोतया पोलिसामुळे आता पुण पोलिसांकडून नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना संपल्यानंतर पुण्यातील अलका टॉकीज चौकात सुशांत पार्टे हा पोलिसांची वर्दी घालून आला होता. पोलिस असल्याचे सांगत त्याने जल्लोष करणाऱ्या अनेक तरुणांना धमकावलं आणि त्यांना मारहाण सुद्धा केली. मात्र यातील काही तरुणांना तो पोलिस नसल्याचे समजले. या सजग तरुणांनी कंट्रोल रूमला फोन केला.

फरासखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुशांतची विचारपूस केली. यावेळी सुशांतने उडवा उडवीची उत्तरं दिली तेव्हा तो तोतया पोलिस असल्याचे निष्पन्न झाले. फरासखाना पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशा बनावट पोलिसांपासून सावधान राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Breaking: धक्कादायक! समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना घरात घुसून मारहाण, शासकीय वर्तुळात खळबळ

Marathi Live News Updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फसवी; खासदार बळवंत वानखेडे यांची टीका

Indian Railway: विविधतेने नटलेला प्रवास अन् उत्तम सुविधा; कशी आहे देशातील सर्वात लांब ट्रेन? वाचा सविस्तर

Fungal Infection : पावसाळ्यात तुम्हालाही होऊ शकतं Fungal Infection; अशी घ्या स्वत:ची काळजी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी अडवणूक, पैशांची मागणी; ग्रामसेवक निलंबित

SCROLL FOR NEXT