Pune Rural Police Recruitment Exam Postponed:  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police Recruitment: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई पदाची परीक्षा पुढे ढकलली, आता कधी होणार?

Pune Rural Police Recruitment Exam Postponed: लेखी परीक्षेस पात्र झालेल्या ५ हजार ५४४ उमेदवारांची लेखी परीक्षा लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली होती.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुणे ग्रामीण पोलिस शिपाई पदाच्या भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या शनिवारी म्हणजे २४ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार होती. पण ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. याची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

पुणे ग्रामीणच्या पोलिस शिपाई पदासाठी २०२२-२३ च्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल २० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे. लेखी परीक्षेस पात्र झालेल्या ५ हजार ५४४ उमेदवारांची लेखी परीक्षा लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली होती. परंतू अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच परीक्षेची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

Jio Recharge: कमी खर्चात जास्त फायदा, ३५५ रुपयांच्या जिओ प्लॅनचे फायदे जाणून घ्या

Pune: पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखून धरला, रास्तारोको करणाऱ्या २५० जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT