Breaking News: विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठे यश! MPSCची परीक्षा पुढे ढकलली; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम

MPSC Exam Postponement: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीमध्ये 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
Breaking News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! नियोजित परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांची मागणी मान्य
Pune MPSC Student Protest: Saamtv
Published On

पुणे, ता. २२ ऑगस्ट २०२४

पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थी आक्रमक झाले असून या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला मोठे यश आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीमध्ये 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.

विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

पुण्यामधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली असून नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीने याबाबत अधिकृत ट्वीट केले आहे. या निर्णयानंतर पुण्यामधील विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.

MPSCची परीक्षा पुढे ढकलली!

"आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. "काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.

Breaking News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! नियोजित परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांची मागणी मान्य
Pune News: सेल्फी काढला, नातेवाईकांना पाठवला अन् आयुष्य संपवलं, खडकवासला धरणात उडी मारुन विद्यार्थ्याची आत्महत्या

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत मोठ्या प्रमाणावर तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला असून शास्त्री रोडवरील एका बाजूची वाहतुक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षा बंद झाल्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला असून आता हे आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.

Breaking News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! नियोजित परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांची मागणी मान्य
Pune News : अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या तरुणीला भोंदूबाबाने लावला चुना; १८ लाख गमावले, पुण्यातील प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com