Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील तरुण अमेरिकेत जहाजावरून बेपत्ता; 3 दिवसांपासून शोध मोहीम सुरू

Pranav Karad Missing : प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याच्या वडीलांनी सांगितलं आहे.

Ruchika Jadhav

Pune News :

पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता. आता तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय फार चितेत आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कला काम करायचा. गेल्या ३ दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केलाय.

प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याच्या वडीलांनी सांगितलं आहे. गोपाळ कराड असं बेपत्ता तरुणाच्या वडिलांचं नाव आहे.

प्रणवच्या वडिलांची प्रतिक्रिया

माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाहीये. मी याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. आमची शोधकाम सुरू आहे, असं कंपनी म्हणत आहे. पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नाही, असंही प्रणवचे वडील म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना ते भावूक देखील झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: BMC निवडणुकीत सेलिब्रिटी रिंगणात, कोण आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री?

Mobile Addiction: जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी दिला ईशारा

Maharashtra Live News Update: दत्ता बहिरट यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Shocking : भाच्याची गर्लफ्रेंड प्रेमात, अनैतिक संबंध अन् हत्येची सुपारी; मामाच्या भयंकर कृत्याने शहरात खळबळ

उमेदवारी अर्ज भरताना भावी नगरसेवकाने आणली 5 हजार रुपयांची चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची काही वेळासाठी दमछाक|VIDEO

SCROLL FOR NEXT