Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: कपडे धुण्यासाठी जाणं जिवावर बेतलं, खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू; दोष कोणाचा?

Katraj- Kondhwa Road: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. या पाण्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या ४ मुली बुडाल्या. यामधील तिघींना वाचवण्यात यश आले तर एकीचा मृत्यू झाला.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यातल्या कात्रज -कोंढवा रस्त्यावरील (Katraj-Kondhwa Road) खड्ड्यात पडून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन मुलींना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेमुळे कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये कपडे धुण्यासाठी या मुली गेल्या होत्या. खड्ड्यात बुडालेल्या एका मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यामध्ये पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचले आहे. या खड्ड्यातील पाण्यात चार मुली पडल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. एका सोसायटीसमोरील महाकाली मंदिराजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती.

पुण्यातल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या शेजारीच असणाऱ्या महाकाली मंदिराजवळ काही लोकं तात्पुरत्या स्वरूपाच्या झोपड्या टाकून राहत आहेत. रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात याठिकाणी राहणाऱ्या महिला आणि मुली कपडे धुण्यासाठी जात असतात. आज काही मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. खड्ड्यामध्ये पाय घसरून मुली पडल्यायाची माहिती प्रत्यक्षदर्शिनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली.

त्यानंतर स्थानिक नागरिकांनी खड्ड्यामध्ये पडलेल्या तीन मुलींना वाचवले आणि त्यांना खड्ड्याच्या बाहेर काढले. पण एका मलीला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. सरगम शिळावत (वय १५ वर्षे), सेजल शिळावत (वय १३ वर्षे), जानू शिळावत (वय १५ वर्षे) अशी बचावलेल्या मुलींची नावं आहेत. या मुली जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मुस्कान शिळावत (वय १६ वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. तिचा मृतदेह शोधण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात

Yavatmal Rain: पैनगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, यवतमाळ- नांदेडदरम्याची वाहतूक ठप्प, दोन जणांचा मृत्यू

वाहन आणि लायसन्ससाठी आधार अन् मोबाईल अनिवार्य; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

Shocking : हृदयद्रावक! बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याने ४ मुलांसह आयुष्य संपवलं

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

SCROLL FOR NEXT