Mumbai Mantralaya : ब्रेकिंग! मंत्रालयात एकाचा संरक्षक जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची एकच पळापळ

Mumbai Mantralaya News : मंत्रालयातील संरक्षक जाळीवर एकाने उडी घेतली आहे. या व्यक्तीने उडी घेतल्यानंतर पोलिसांची एकच पळापळ झाली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतली आहे.
मंत्रालयातील संरक्षक जाळीवर एकाने उडी घेतली; पोलिसांची एकच पळापळ
Mumbai MantralayaSaam tv

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील मंत्रालयात एका व्यक्तीने संरक्षक जाळीवर उडी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांची एक पळापळ झाली. पोलिसांनी तातडीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पुन्हा एकदा मंत्रालयात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीने मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी घेतली. या संरक्षक जाळीवर उडी मारल्याने व्यक्ती सुरक्षित आहेत. या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मंत्रालयातील संरक्षक जाळीवर एकाने उडी घेतली; पोलिसांची एकच पळापळ
Monsoon Session: राज्याचं पावसाळी अधिवेशन 27 जूनला; मंत्रिमंडळात निर्णय

या व्यक्तीने सरंक्षक जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला ताब्यात घेतलं. मंत्रालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त केलं.

मंत्रालयातील संरक्षक जाळीवर एकाने उडी घेतली; पोलिसांची एकच पळापळ
Pune Airport : पुणे विमानतळावर सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

संरक्षक जाळीवर उडी घेणाऱ्या व्यक्तीविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. या व्यक्तीने उडी घेतल्यानंतर मंत्रालयाच्या गॅलरीमध्ये कर्मचारी आणि नागरिकांची एकच गर्दी झाली. संरक्षक जाळीवर उडी घेण्याच्या घटना या आधी देखील घडल्या आहेत.

उडी घेण्याचं कारण अद्याप अस्पष्ट

मंत्रालयात जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्यक्तीच्या हातात बॉटल देखील होती. व्यक्तीच्या हातातील बॉटलमध्ये विष असल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीला पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत. या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचं अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com