Manoj Jarange On Devendra Fadnavis  Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: 'देवेंद्र फडणवीस खुनशी, माझ्यावर SIT लावली, पण मागे हटणार नाही', जरांगे पाटील कडाडले; पाहा VIDEO

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: दौऱ्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेबाबत महत्वाचे विधान केले तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे|ता. ३ सप्टेंबर २०२४

Manoj Jarange Patil On Assembly Election: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज निवडणुकांच्या तयारीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार असून २१ जागांवर चर्चा होणार आहे. या दौऱ्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेबाबत महत्वाचे विधान केले तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"विधानसभेबाबत कसलाच फायनल निर्णय केला नाही. अंतिम निर्णय समाजाशी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन होणार आहे. पुण्यातील २१ मतदार संघातील काल आढावा घेतला आहे. पण निर्णय झालेला नाही. काल समाजाचे पुण्यातील सर्व लोक उपस्थित नव्हते. ⁠उमेदवारीवरुन नाराजी होऊ शकते. वाद होऊ शकतो. मात्र विधानसभेला आमच्या विचारांचे उमेदवार देणार आहेआम्ही एक ही जागा सोडणार नाही," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

तसेच "भाजपचे नेतेच मला सांगतात, फडणवीस खुप खुनशी आहेत. कसा कोणाला संपवतो. ओबीसींना कसे नादाला लावतो. सर्व समाजाचे नेते मला गुपचुप येऊन भेटतात. त्यात भाजपचे नेते देखील आहे. ⁠जेलला टाकील अशी धमकी फडणवीस देतात. पंढरपुरच्या अभिजीत पाटील यांना देखील अशीच धमकी दिली. ⁠तुम्ही बळीच नेते जमवुन निवडुन येऊ शकत नाही. त्यांनी असे बरेच टाकाऊ चेहरे जमा केले आहेत," असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली.

अध्यादेश निघू देत नाहीत...

"मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला आहे. त्याचे तत्काळ पंचनामे करा. त्यांना मदत द्या. ही कामे करा. देवेंद्र फडणवीस ही कामे करत नाही. तात्पुरते नादाला लावतात. लाडक्या बहीणीच्या लेकराला आरक्षण पाहीजे, ते कधी देणार? लाडक्या दाजीला शेतमालाला भाव कधी देणार? माझे १३ वर्षाचे लफडे बाहेर काढले. हे देवेंद्र फाडणवीसनेच केले आहे. एसआयटी नेमली आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

मी घाबरणार नाही, मागे हटणार नाही..

तसेच " मी कशाला बधणार नाही. मी मागे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रु नाही. आमचा विरोधक पण नाही. त्यांची फक्त वागण्याची पद्धत चांगली नाही. सग्या सोयऱ्यांची अधिसूचना निघाली आहे मात्र देवेंद्र फडणवीस आध्यादेश निघू देत नाहीत," असे आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT