Drug and Arms Crackdown in Pune, Police Seize Pistols  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Pune crime : पुण्यात मोठी घडामोड, पिस्तूल विकणाऱ्याला रंगेहाथ पकडले

Pune Latest News :पुण्यात वडगाव परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगाराला अटक; तीन पिस्तूल, सहा काडतुसे जप्त, सलग दुसऱ्या दिवशी मोठी पोलिस कारवाई.

Akshay Badve

Pune Crime News Update : पुण्यात पिस्तूल विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांना अटक केली आहे. तरुणाकडून तीन पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आज ही कारवाई केली आहे. पुण्यातील वडगाव परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २७, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक युनिट १ चे कर्मचारी यांना माहिती मिळाली होती की सराईत गुन्हेगार ठोंबरे हा मुंबई बेंगलोर महामार्गालगत असलेल्या वडगाव परिसरात पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. सापळा रचून ठोंबरेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅग मधून ७५ हजार रुपये किंमतीच्या ३ पिस्तूल मिळून आल्या. तसेच त्याच्या बॅग मध्ये जिवंत काडतुसे सुद्धा आढळून आली. ठोंबरे याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही पिस्तूल तो कोणाला विकणार होता याचा तपास सुरू आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी अमली पदार्थ जप्त

रविवारी पुण्यात २६ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते या नंतर पुन्हा सोमवारी पोलिसांनी कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या २ सराईत तरुणांना अटक केली आहे. गांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २२ किलो गांजा, मोबाईल, दुचाकी आणि इतर साहित्य असा सुमारे चार लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अक्षय अंकुश माने आणि यश राजेश चिवे अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या दोघांवर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मोठ्या नायलॉनचे पोत्यामध्ये त्यांनी विक्रीसाठी हा गांजा आणला होता. पोलिसांनी पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये २२ किलो गांजा आढळून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : गर्दी टाळण्यासाठी कामाची वेळ बदला, ८०० कार्यालयांना शिफ्ट बदलण्याचे मध्य रेल्वेने केले आवाहन

Maharashtra Live News Update : भंडाऱ्याच्या ओपारा गावाला पुराच्या पाण्याचा विळखा

Pratap Sarnaik : 'मला कुणीही अडवलं नाही, अडवणाऱ्याला मी भीक घालत नाही'; प्रताप सरनाईकांचा पलटवार

Bollywood Singer: वरळी सी लिंकवर प्रसिद्ध गायकाचा आत्महत्येचा प्रयत्न? की पब्लिक स्टंट? व्हिडिओ व्हायरल

Shirpur News : मोबाईल पाहताना चुकून फाइलवर झाले क्लीक; पुढे जे घडले ते भयंकर, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT