Lokmanya Nagar residents protest against MHADA and local MLA after redevelopment project halted. saam tv
मुंबई/पुणे

Pune News: कुणी नवं घर देतं का घर...आमदाराचा हस्तक्षेप अन् म्हाडाचा अनागोंदी कारभार, ८०३ कुटुंबियांच्या घराचं स्वप्न बेचिराख

Pune Mhada: म्हाडाच्या गैरव्यवस्थापनामुळे आणि स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्प थांबला आहे. यामुळे ८०३ कुटुंबांचे घरांचे स्वप्न भंगलंय. रहिवाशांनी तातडीने सरकारी कारवाईची मागणी केलीय.

Bharat Jadhav

  • आमदाराच्या हस्तक्षेपामुळे लोकमान्यनगर पुनर्विकास प्रकल्पावर स्थगिती.

  • शासनाने हस्तक्षेप करून पुनर्विकास सुरू करावा, अशी मागणी केली जातेय.

  • ८०३ कुटुंबांचं घराचं स्वप्न भंगलं आहे.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे "कोणी नवीन घर देत का घर" अशी लोकमान्यनगर वासीयांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्यनगर येथील रहिवासी एकत्र येवून लोकमान्यनगर बचावासाठी आक्रमक झाले आहेत. गेली अनेक वर्षं चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदाराने हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळविल्याने त्यामुळे लोकमान्य नगरमधील ८०३ घरात राहणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला.

लोकमान्यनगरमधील काही सोसायट्यांनी स्वतःचा बिल्डर नेमला. इमारती तयार झाल्यानंतर लवकरच रहिवासी रहाण्यासाठी जाणार आहेत. यामध्ये मित्तल बिल्डर्सचे डॉ. नरेश मित्तल यांनी ४२, ४३, ४४, ४५ सदरील चारही मिळून सोसायटी झाली म्हाडाने करोडो रुपये घेवून परवानगी दिली. तरी देखील स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर देशपांडे बिल्डर्स हे इमारत क्रमांक ३६, ३७, ३९ तसेच मानव बिल्डर्स इमारत क्रमांक ३४, ३५ जोगळे बिल्डर्स इमारत क्रमांक ११, ११ अ, १२ गौतम ढवळे आयकॉन डेव्हपर्स यांच्याकडे इमारत क्रमांक १,२,३,४ म्हाडाकडे परवानगीसाठी कायदेशीर कागदपत्रे देवून देखील म्हाडाने कामाला खीळ बसवली आहे.

इमारत क्रमांक १५ आणि ५३ श्रीकांत उणेचा बिल्डर्स यांच्या म्हाडाकडे परवानगीसाठी अंतिम टप्प्यात आहेत. तसेच इतर सोसायट्या देखील विविध बिल्डर बरोबर पुनर्विकासाठी चर्चा व प्रयत्नशील आहेत. इमारत क्रमांक १५ आणि ५३ श्रीकांत उणेचा बिल्डर्स यांच्या म्हाडाकडे परवानगीसाठी अंतिम टप्प्यात आहेत. तसेच इतर सोसायट्या देखील विविध बिल्डर बरोबर पुनर्विकासाठी चर्चा व प्रयत्नशील आहेत.

तर भिंतीना चिरा पडल्या आहेत. काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. दरम्यान येथील सर्व इमारती कॉपरेटिव सोसायटी रजिस्टर झाल्यात. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली आहे. सेल डीड, लीस डीड, कन्व्हेन्स डिड झाले असून देखील म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.जर ही स्थगिती उठली नाही तर भाजप कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करू असा इशारा लोकमान्यनगर बचाव कृती समितीने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Neha Kakkar: नेहा कक्करचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी थक्क; ट्रोलर्स म्हणाले, 'ही कसली फॅशन काहीही घालशील...'

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला! भरधाव कार दरीत कोसळली, ३ शिक्षकांचा मृत्यू

Eknath Shinde : शिंदेसेनेच्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक सोलापुरात, ४ ठिकाणी भाजपसोबत संघर्ष

Pune Police : पुण्याच्या १०५ पोलिसांचे मध्य प्रदेशात स्पेशल ऑपरेशन, पण खर्च केला कुणी? अधिकार्‍यांचे मौन

SCROLL FOR NEXT