Pune News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Pune Little Girl Message To Use Helmet Viral Video: हाच संदेश पुणेकरांना देण्यासाठी एक चिमुकली रस्त्यावर उतरली आहे. यासाठी तिने बनवलेले सुंदर पोस्टर सध्या पुण्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. ४ मे २०२४

हेल्मेट वापरा सुरक्षित राहा असे आवाहन वाहन चालकांना नेहमी केले जाते. मात्र तरीही अनेकजण बेजबाबदारपणे विना हेल्मेट वाहन चालवताना दिसतात. हाच हलगर्जीपणा जीवावरही बेतू शकतो. त्यामुळे हेल्मेट किती महत्वाचं आहे, याबाबत अनेक कार्यक्रमांमधूनही जनजागृतीही केली जाते. आता हाच संदेश पुणेकरांना देण्यासाठी एक चिमुकली रस्त्यावर उतरली आहे. यासाठी तिने बनवलेले सुंदर पोस्टर सध्या पुण्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. काय आहे नेमकं प्रकरण, जाणून घ्या.

चिमुकल्या श्रिशाचा व्हिडिओ चर्चेत..

"मोबाईल साधा असला तरी त्याला कव्हर असतं मग डोक्यावर हेल्मेट का बरं नसतं? असा संदेश लिहलेला पोस्टर हातात घेऊन उभी असलेली गोड चिमुकली सध्या संपूर्ण पुणे शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. श्रिशा लोंढे असं या चिमुकलीचे नाव असून ती पिंपरी चिंचवडमधील मोशी भागात राहते. सध्या श्रीशा पुणेकरांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करत शहरातील सिग्नल, तसेच मुख्य ठिकाणी हातात पोस्टर घेऊन उभी राहून जनजागृती करताना दिसत आहे.

तिच्या पोस्टरवर लिहलेला "मोबाईल साधा असला तरी त्याला कव्हर असतं मग डोक्यावर हेल्मेट का बरं नसतं?" असा मार्मिक अन् विचार करायला लावणारा संदेश पुणेकरांचं लक्ष वेधत आहे. श्रीशाच्या या आवाहनाला तिच्या पुणेकरांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळून तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकही गर्दी करताना दिसतायेत.

(व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

https://www.facebook.com/share/r/x7Gg9awNemuPXrfr/?mibextid=0VwfS7

विशेष म्हणजे वाहतूक पोलीस देखील नागरिकांना चिमुकलीचा संदेश दाखवत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत. सध्या या गोड चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या संदेशाचं अन् छोट्याशा कृतीचे नेटकरीही भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

पुण्यातील अपघाताची धक्कादायक आकडेवारी..

दरम्यान, पुणे शहरातील वाढत्या अपघातांची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. पुणे शहरात रस्ते अपघातात मोठी वाढ झाली असून ३ महिन्यात वेगवेगळ्या अपघातात २४ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर मागच्या ९० दिवसात झालेल्या अपघातात ९१ जण गंभीर जखमी झालेत. पुणे शहरात गेल्या वर्षी ४ हजार अपघात झालेत. यामध्ये नवले पुलासह ,मुंढवा, हडपसर,, भूमकर चौक अशा अनेक ठिकाणी अपघाताचे ब्लॅक स्पॉट आढळून दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील बेस्ट किल्ला, मित्रांसोबत 'या' ठिकाणी वीकेंड प्लान करा

Maharashtra Live News Update: भाजपकडून संघटनात्मक आढावा बैठका, माजी नगरसेवक, आमदार, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्षांची हजेरी

Self Help Allowance : बेरोजगारांना महिन्याला मिळणार १००० रुपये; निवडणुकीच्या तोंडावर नितीश सरकारची मोठी घोषणा

OBC Reservation: ''आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळ यांचा शरद पवारांना सवाल

Dudhi Halwa Recipe : नवरात्रीचा प्रसाद होईल स्पेशल, झटपट बनवा दुधीचा चविष्ट हलवा

SCROLL FOR NEXT