Pune Traffic Jam Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic Jam: अवकाळी पावसाने पुणे शहराला झोडपलं, पुणे-नगर महामार्गावर होर्डिंग कोसळल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

Pune Unseasonal Rain: पुणे-नगर महामार्गावरील (Pune-Nagar High Way) वाघोलीमध्ये पार्किंमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर होल्डिंग पडले. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली पाहिजे.

Priya More

पुण्यामध्ये अवकाळी पावसाला (Unseasonal Rain) सुरूवात झाली आहे. या पावसामुळे पुण्यात पुन्हा एकदा धोकादायक होल्डिंग पडून दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. पुणे-नगर महामार्गावरील (Pune-Nagar High Way) वाघोलीमध्ये पार्किंमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर होल्डिंग पडले. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली पाहिजे.

पुण्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. या पावासामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाघोलीमध्ये होर्डिंग पडले. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहे. होर्डिंग पडल्यामुळे विद्युत तारा तुटल्या आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून कटरच्या सहाय्याने होर्डिंग कापून ते हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनास्थळावर विजेच्या तारा तुटल्यामुळे अंधार झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच होल्डिंग पडण्याचा धोका निर्माण झाल्याने होल्डिंगबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. अनधिकृत होल्डिंगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे.

तर दुसरीकडे, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बीड- पुणे महामार्गावरील निर्गुडी गावाजवळ झाडे उन्मळून पडल्याने महामार्ग बंद झाला. तर नाळवंडीमध्ये आठ ते दहा घरांची पडझड झाल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय. त्याचबरोबर गावामधील जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड पडलंय. विद्युत पोलच्या तारा खाली आल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT