Maharashtra Weather Update: नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढचे ४ दिवस अवकाळी पावसासोबत येणार उष्णतेची लाट

Heatwave In Maharashtra: एकीकडे राज्यात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर दुसरीकडे तापमान वाढल्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत. या ऊन-पावासाच्या खेळामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
Heatwave In Maharashtra
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ऊन -पावसाचा खेळ सुरूच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. तर काही राज्यांमध्ये कडाक्याच्या ऊन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. एकीकडे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर दुसरीकडे तापमान वाढल्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत. या ऊन-पावासाच्या खेळामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये आता हवामान खात्याने (Weather Deaprtment) राज्यात पुढचे ४ दिवस काही जिल्ह्यात अवाकळी पाऊस तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला, आंबा, संत्रे, कांदा, मका, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. अशामध्ये सरकारने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढल आहे. राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. त्याचसोबत नांदेड, पैठण आणि पालघर उष्णाघाताने मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

Heatwave In Maharashtra
Maharashtra Unseasonal Rain: पुण्यासह ८ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Heatwave In Maharashtra
Madha Loksabha Election 2024: माढ्याच्या जागेसाठी भाजपचं टेन्शन वाढलं, चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com