Madha Loksabha Election 2024: माढ्याच्या जागेसाठी भाजपचं टेन्शन वाढलं, चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे चर्चा

Chandrakant Patil On Madha Loksabha Election: पंढरपूरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे माढ्याच्या जागेसाठी टेन्शन वाढलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Chandrakant Patil On Madha Loksabha Election
Chandrakant Patil On Madha Loksabha ElectionSaam Tv

'माढा लोकसभा मतदार संघातील (Madha Loksabha Election 2024) निवडणूक ही भाजपसाठी कठीण आहे. तर सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही.' असे वक्तव्य भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे माढ्याच्या जागेसाठी टेन्शन वाढलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांत पाटील आज मंगळवेढा दौऱ्यावर आले होते. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. 'सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही. पण माढ्याची थोडी कठीण नव्हती ती कठीण केली गेली आहे. पण मी तुम्हाला रामनवमीच्या निमत्ताने एक सांगतो. हे कार्य इश्वरीक आहे आणि ईश्वराला देखील काळजी आहे. तो त्याचा बॅलेन्स करत असतो.', असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Chandrakant Patil On Madha Loksabha Election
Amit Thackeray: त्यांना पंतप्रधान व्हायचंय...., अमित ठाकरेंचा वसंत मोरेंवर निशाणा

महाविकास आघाडीच्या काळामध्ये चंद्रकांत पाटील यांना अटक होण्याची भीती होती. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 'सरकार गेलं. मी राज्याचा अध्यक्ष होतो. ३३ महिने काय सहन केलं आम्हाला माहिती होते. कुठल्याही क्षणी अटक होणार होती. मला खात्री होती की हे पण दिवस जातील आणि ते दिवस गेले. कोणाच्या ध्यानी मनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे या कामाची चिंता परमेश्वराला आहे. रामनवमीच्या शुभेच्छा देत आपण जोमाने काम करूया.', असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Chandrakant Patil On Madha Loksabha Election
Maharashatra Election: मनसेकडून समन्वयकांची यादी जाहीर; पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

तसंच, महाराष्ट्रात महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा मिळतील अशा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, 'सर्वे काहीपण सांगू द्या पण राज्यात महायुतीला 45 पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही. उरलेल्या तीन जागा कशा मिळतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यात महायुतीला 45 पेक्षा कमी जागा मिळतील असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी ते स्वप्न पाहू नये.' असा टोला त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

Chandrakant Patil On Madha Loksabha Election
Sangli Lok Sabha: विशाल पाटील शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेणार? अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजितसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे माढ्यातील मोहिते-पाटील घराणं नाराज झाले. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर माढ्यातून महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. अशामध्ये माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना होणार आहे.

Chandrakant Patil On Madha Loksabha Election
Kolhapur Constituency : गोकुळचे संचालक चेतन नरकेंची लाेकसभा निवडणुकीतून माघार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com