Pune Gym Trainer Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांनो सावधान, पुण्यात स्टेरॉइडची होतेय विक्री; पाहा VIDEO

Pune Gym Trainer Arrested: जिम ट्रेनरकडून १३ इंजेक्शन आणि ५ सीरीज जप्त करण्यात आल्या आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी जिम ट्रेनरला अटक केली असून तपास सुरू आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

बॉडी बिल्डिंग (Body Building) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये स्टेरॉइडची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याच्या सातारा रोड परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी जिमच्या कोचला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १३ इंजेक्शन आणि ५ सीरीज जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडून सुरू आहे.

कमी काळात चांगली बॉडी व्हावी यासाठी अनेक तरुण हे शरीराला हानिकारक असलेले स्टेरॉइड घेत असतात. पुण्यात एका जिम कोचने चक्क स्टेरॉइडची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील सातारा रोड परिसरात असणाऱ्या 'मास्टरपिस जिम'मध्ये एका जिम कोचने या स्टेरॉइडची विक्री केली आहे.

मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन असे या स्टेरॉइडचे नाव असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत. आझाद खान असे या जिम कोचचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत त्याच्याकडून १३ इंजेक्शन आणि ५ सीरींज जप्त करण्यात आल्या आहेत. या एका इंजेक्शनची किंमत ४०० रुपये असून आतापर्यंत अनेक बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांना त्याने हे इंजेक्शन विकल्याचे समोर आले आहे. आझाद खानविरोधात कलम ३३६, २७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT