Guillain Barre Syndrome Virus Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात मेंदू व्हायरस, गुईलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रूग्ण, पाहा स्पेशल रिपोर्ट

Guillain Barre Syndrome : पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळलेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ आजारानं पुणेकरांचं टेंशन वाढवलंय. त्यावरचा हा रिपोर्ट.

Snehil Shivaji

Guillain Barre Syndrome Cases In Pune : कोरोना, मंकी पॉक्सनंतर आता राज्याला एका नव्या आजारानं घेरलंय. गुइलेन-बॅरे सिंड्रोम! मेदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या या आजाराचे संशयित रुग्ण समोर आल्यानं आरोग्यव्यवस्था अलर्ट मोडवर आलीये. लाखात एका व्यक्तीला होणाऱ्या या आजाराची पुण्यात तब्बल २२ जणांना लागण झाली आहे. नेमका हा आजार काय आहे पाहुयात.

गुईलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?

- गुईलेन बॅरे सिंड्रोमचा थेट नसांवर परिणाम

- आजारामुळे स्नायू कमकुवत आणि संवेदनाहीन

- हातापायाला आधी मुंग्या नंतर अर्धांगवायुचा धोका

- कमी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास

- स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यात अडथळा

- गिळण्यात अडचण तसंच डोळ्यांची समस्या

राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं डोक वर काढल्यामुळे सगळ्यांची चिंता वाढलीये. मात्र हा आजार नेमका कशा मुळे होतो ते देखील पाहुया.

कशामुळे होतो गुईलेन बॅरे सिंड्रोम?

- रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर आजाराचा धोका

- कोणतंही व्हायरल इंफेक्शन झालं असल्यास गुईलेन बॅरे सिंड्रोमची लागण होऊ शकते.

गुईलेन बॅरे सिंड्रोम होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

काय काळजी घ्याल ?

- आपले हात वारंवार धुवा.

- फ्लूबाधित आणि इतर संक्रमित रुग्णांपासून दूर राहा.

- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा

गुईलेन-बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो त्यामुळे जर तुमच्या शरीराला वारंवार मुंग्या येत असतील किंवा स्नायू कमकुवत होत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT