Darade Arrested
Darade Arrested Saam TV
मुंबई/पुणे

Govt Officer Shailaja Darade Arrested : राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक, भावावरही गुन्हा दाखल

Dnyaneshwar Choutmal

Pune News : राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आलं होत. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता.

शैलजा दराडे यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता शैलजा दराडे यांना अटक केली.

शैलजा यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते. (Maharashtra News)

राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली होती. फसवणुकीचे हे प्रकार 15 जून 2019 पासून सुरु होते. (Latest Marathi News)

डी .एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी 12 लाख तर बी. एड. झालेल्या उमेदवारांकडून 14 लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

SCROLL FOR NEXT