Pune  sAAM TV
मुंबई/पुणे

Pune News: हृदयद्रावक! शॉक लागून बाप-लेकासह चार जणांचा मृत्यू

भोर तालुक्यातील निगेडे गावातील ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : पुण्यातील भोरमध्ये एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. विजेचा शॉक लागून बाप लेकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. भोर तालुक्यातील निगेडे गावातील ही घटना घडली आहे.

नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना शॉक लागल्याने या चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, चारही व्यक्ती गावातील बंधाऱ्यामध्ये मोटार बसवण्यासाठी गेले असताना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बाप लेकासह चौघेजण आहेत. (Latest Marathi News)

गुंजवणी नदीच्या पात्रात पाण्यात मोटार सोडत असताना शॉक लागला आणि ही दुर्दैवी घटना घडली. विठ्ठल सुदाम मालुसरे (वय 45), सनी विठ्ठल मालुसरे (वय 26), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय 55), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय 36) अशी चौघांची नावं आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासन दाखल झालं असून माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून निगडे गाव संपूर्ण शोकाकुल वातावरणामध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT