Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police : आधी हप्ता घेतला, नंतर बेडशीटही पळवल्या; पुण्यात दोन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन

Pune Police Suspended: पुण्यामध्ये बेडशीट विक्रेत्याकडून १४ हजारांचा हफ्ता घेऊन त्यांच्याकडी २३ बेडशीट फुकटात घेणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये दोन पोलिसांना (Pune Police) तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्‍या विक्रेत्याकडून या पोलिसांनी १४ हजार रुपयांचा हप्ता घेतला. हफ्ता घेतल्यानंतरही या पोलिसांनी विक्रेत्याकडून २३ बेडशिट फुकटात घेतल्या. पोलिस उपायुक्त झोन ४ यांनी या दोन्ही पोलिस शिपायांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

पोलिस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर आणि संजय महादेव आसवले अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत. दोघेही विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. हा प्रकार १७ सप्टेंबर रोजी विमाननगर परिसरात घडला होता. वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी तक्रार दिल्यानंतर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात काहीजण बेडशिट विक्रीसाठी थांबले होते. १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलिस शिपाई सुनिल कुसाळकर आणि संजय आसवले त्याठिकाणी आले. तुम्ही का थांबलात इथे? थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल असे सांगून त्यांच्याकडील ६० बेडशिट स्कार्पिओ गाडीमध्ये टाकून निघून गेले. त्यानंतर विक्रेत्यांकडून त्यांनी १४ हजार रुपये हप्ता म्हणून घेतले.

त्यानंतर बेडशीट विक्रेते अल्थमेश आणि त्यांच्या मित्रांनी बेडशिटची मागणी केल्यानंतर पोलिसांनी ६० बेडशिटपैकी ३७ बेडशिट परत दिले. २३ बेडशिट स्वत:कडे ठेवून घेतले होते. याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये १८ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून पोलिस उपायुक्त यांनी कारवाई करत दोन्ही पोलिसांचे निलंबन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT