Maharashtra Politics SAAM Digital
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यातील भाजप आमदारांचे 'लाडक्या बहिणीं'कडे दुर्लक्ष, मेळावे न घेतल्याने पक्षश्रेष्ठी नाराज; सर्वेक्षणातून मोठा खुलासा

Pune BJP News: शहरातील पर्वती, खडकवासला, कॅन्टोन्मेंट, मतदार संघांमधील आमदारांनी संविधान मेळावा तसेच लाडकी बहीण मेळाव्याचे कार्यक्रम घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. २ ऑक्टोबर

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीने जय्यत तयारी सुरु केली आहे. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरु केला असून सर्वत्र मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अशातच पुण्यात वरिष्ठांनी सांगूनही भाजप आमदारांनी लाडकी बहीण योजना मिळावे घेतले नसल्याचे समोर आले असून याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यात वरिष्ठांनी सांगूनही भाजप आमदारांनी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्याचे कार्यक्रम घेतले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यामधील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांवर पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील पर्वती, खडकवासला, कॅन्टोन्मेंट, मतदार संघांमधील आमदारांनी संविधान मेळावा तसेच लाडकी बहीण मेळाव्याचे कार्यक्रम घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

प्रदेश भाजपकडून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुण्यामध्ये भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार असल्याचे समोर आलं आहे. अँटी इन्कम्बन्सीचा सूर असलेल्या मतदारसंघात पक्ष चाचपणी करण्याची शक्यता असून पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपशी संलग्न असलेल्या एका संघटनेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुद्धा पर्वतीमध्ये पक्षाला फटका बसू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या १५ वर्षात म्हणावी तशी विकासकामे झाली नाहीत, अशी माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. तसेच मतदारसंघात लाडकी बहिण, दलीत मेळावे यांसारखे कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पक्षाच्या या सूचनेकडे मतदारसंघात दुर्लक्ष करण्यात आल्याचा खुलासाही या नव्या अहवालामधून झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT