Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: CBI मधून बोलतोय..., पुण्यातील इंजिनिअर तरुणीला घातला ३.५० कोटींचा गंडा

Pune Police: पुण्यामध्ये सायबर चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. कम्प्युटर इंजिनिअर तरुणीला तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. फोनद्वारे नागरिकांना लाखो ते कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसातून बोलत असल्याची बतावणी करत एका महिलेला २० लाखांचा गंडा घातला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये एका महिलेला तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चायनामध्ये तुमच्या नावाने ड्रग्स पाठवलेत असं म्हणत महिलेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. उच्च शिक्षित महिलेला सायबर चोरट्यांनी ३.५० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. शांघाई शहरात पाठविलेल्या कुरिअरमध्ये एटीएम कार्ड, अमली पदार्थ सापडले आहेत असं सांगत या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातील मगरपट्टा सिटीत राहणाऱ्या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जून ते १५ सप्टेंबर २०२४ या दरम्यानच्या काळात घडली आहे. तक्रारदार महिला या कम्प्युटर इंजिनिअर असून एका आयटी कंपनीमध्ये त्या कार्यरत आहेत. सायबर चोरट्याने तक्रारदार फिर्यादी यांना संपर्क करून आधी कुरिअर कंपनीतून त्यानंतर मुंबई पोलिस आणि सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगितले. 'तुमच्या नावाने मुंबई ते शांघाई पार्सल पाठविले जात असून त्यात मोठ्या प्रमाणात एटीएम कार्ड, चार किलो कपडे आणि अमली पदार्थ सापडले आहेत.', असं सांगितलं.

यावर सायबर चोरटे थांबले नाहीत. त्यांनी महिलेला त्यांच्या बँक खात्यावरील पैसे सरकारी सुरक्षा खात्यावर पाठवून तपासायचे असल्याचे सांगून ३ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आता पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे जर अशापद्धतीने कॉल येत असतील तर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT