Pune Latest News
Pune Latest News

Pune : पुण्यात काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना; अंगात काचा घुसल्याने ४ कामगारांचा जागीच मृत्यू

Pune Latest News : काचेच्या स्लाईड खाली उतरवताना पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय.
Published on

Pune Latest Marathi News : पुण्यामधील येवलेवाडीत काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच चार कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलेय.

अमित शिवशंकर कुमार (वय २७ वर्ष), विकास सर्जू प्रसाद गौतम (वय २३ वर्षे ), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०) आणि पवन रामचंद्र कुमार (वय ४४ वर्षे ) अशी मृत झालेल्या मजूरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेले सर्व मजूर हे मूळचे उत्तर प्रदेशमधील आहेत. जगतपाल संतराम सरोज , मोनेश्वर (पूर्ण नाव माहित नाही)हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटेनप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येवलेवाडी रस्त्यावर सीएनजी पेट्रोल पंपाच्या मागे 'इंडिया ग्लास सोल्युशन' नावाचा काचेचा मोठा कारखाना आहे. या ठिकाणी मोठं-मोठे काच आणले जातात. त्यानंतर काचावर प्रक्रिया केली जाते आणि ते विक्रीसाठी बाजारात आणले जातात.

नेहमीप्रमाणेच रविवारी दुपारच्या वेळीस काचेचा ट्रक कारखान्यात आला होता. ट्रकमधून काच उतरवून घेण्याचे काम 10 कामगार करत होते. काचेचे मोठे स्लाईड खाली उतरवत असताना स्लाईडला बांधण्यात आलेला बेल्ट तुटला. दोन मोठे काचेचे स्लाईड या मजुरांच्या अंगावर पडले. अंगावरच काच पडल्याने काचेचे तुकडे अंगात घुसल्याने चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच स्थनिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली असून, पोलीस हा कारखाना कोणाचा याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com