Cyber fraud Saam tv
मुंबई/पुणे

Pune Cyber Fraud: विद्येचे माहेरघर सायबर क्राईमच्या जाळ्यात... ८ महिन्यात तब्बल १११४ गुन्हे, पुणेकरांना २० कोटींचा गंडा

Pune Online Fraud Crime: पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आत्तापर्यंत जानेवारी 2023 ते 31ऑगस्ट या आठ महिन्यात 1114 फसवणूकींच्या गुन्ह्यांचे अर्ज आले आहेत.

Gangappa Pujari

Pune Cyber Crime Cases:

सध्या सर्व व्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन सुरू आहे. ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. पुण्यामध्ये ऑनलाईन फसवणूकीचे सर्वात जास्त प्रकार समोर आले असून विविध प्रकरणात आठ महिन्यात तब्बल २० कोटींची फसवणूक झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याने गुन्हेगारीचे स्वरुपही बदलले आहे. चोरट्यांनी आपला मोर्चा सायबर क्राईमकडे वळवला असून कधी नोकरीचे आमिष, तर कधी ऑनलाईन पैसे मिळवण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात सर्वात जास्त सायबर गुन्हे उघडकीस आले आहेत. पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आत्तापर्यंत जानेवारी 2023 ते 31ऑगस्ट या आठ महिन्यात 1114 फसवणूकींच्या गुन्ह्यांचे अर्ज आले असून यात फक्त ऑनलाईन टास्क या गुन्ह्यात 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे.

यामध्ये मनी ट्रान्स्फरचे 56 गुन्हे, केव्हाएसी अपडेटचे 42 गुन्हे, क्रीपटोकरन्सीचे 58, इंशोरंसबाबत फसवणुकीचे 10, जॉब फसवणुकीचे 31, शेअर मार्केट फ्रॉडचे 27, लोन फ्रॉडचे29, ऑनलाईन सेल आणि परचेस फ्रॉडचे 62, फेक प्रोफाईलचे 85, फेसबुक हॅकिंगचे 34 आणि सेक्सटॉर्षणचे 35 अशा गुन्ह्यांची नोंद आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT