Pune News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime Branch News: पुणे- सोलापूर महामार्गावर कोट्यवधी रुपयांनी भरलेल्या ६ बॅगा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Crores of Rupees Seized on Pune-Solapur Highway: नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या? या अनुषंगाने पाेलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Crime Branch News: पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना वाहतुक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी कोट्यवधींच्या नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमधून जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का? नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या? या अनुषंगाने पाेलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात नाकाबंदी करत असताना पोलिसांना एका ब्रीझा कारमध्ये पैशांच्या बॅगा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी ६ पिशव्यात कोट्यावधी रुपयांच्या रक्कमेसह पैसे मोजण्याचे मशीनही पोलिसांनी जप्त केले आहे. (Latest Marathi News)

जप्त केलेल्या गाडीत एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये इतकी रक्कम आढळू आली आहे. या प्रकरणात प्रशांत धनपाल गांधी (वय, 47 वर्षे) या व्यक्तीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. (Pune Crime Branch)

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेले प्रशांत धनपाल गांधी (रा. लासुर्णे ता.इंदापूर जि.पुणे हे खत विक्री,दूध व्यवसाय, तसेच किराणा दुकान व शेती व्यवसायिक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही रक्कम बॅँकेत भरण्यासाठी घेवून जात असल्याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणी संबंधित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून हडपसर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. ही रक्कम कर्नाटक निवडणूकासाठी घेवून जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पुणे आयकर विभाग या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT