Vishwanath Mahadeshwar Passed Away: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

Vishwanath Mahadeshwar Death News: वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Vishwanath Mahadeshwar Dies
Vishwanath Mahadeshwar Dies Saam TV

निवृत्ती बाबर

Vishwanath Mahadeshwar Passed Away: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच आकस्मिक निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 2 वाजता निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विश्वनाथ महाडेश्वर यांच निधन झालं आहे. आज दुपारी 2 वाजता वांद्रे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून 4 वाजता अंत्ययात्रा निघेल. दुपारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अंत्यदर्शनाला जाणार आहेत. (Latest Marathi News)

Vishwanath Mahadeshwar Dies
Asaduddin Owaisi on PM Narendra Modi: 'द केरला स्टोरी' सिनेमावरून ओवेसींनी PM मोदींवर साधला निशाणा; म्हणाले...

विश्वनाथ महाडेश्वर यांचा राजकीय प्रवास

2002 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवडून आले. 2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 2007 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. 2012 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. तर 2017 बृहन्मुंबई (Mumbai) महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांची निवड झाली.

Vishwanath Mahadeshwar Dies
Nashik News: नाशिकमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे: दादाजी भुसे

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) असताना भाजप नेते किरीट सोमया मारहान प्रकरणी महाडेश्वर यांना अटक झाली होती. अंधेरी (Andheri) विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ऋतुजा लटके यांचा पालिकेतून राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी महाडेश्वरांनी विशेष प्रयत्न केले होते. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसताना अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी विश्वनाथ महाडेश्वर यांच देखील नाव चर्चेत होत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com