Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांना सर्दी, खोकल्‍यानं वाढला 'ताप', साथीच्या आजाराचे रूग्ण वाढले, काय घ्याल काळजी?

Pune News: पुण्यात पावसाचा जोर वाढत आहे. पुण्यात पावसामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहे. विषाणूजन्य आजार वाढत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याच्या समस्या होत आहेत.

Siddhi Hande

राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. पावसामुळे नागरिकांना मात्र खूप त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे वातावरण सतत बदलत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

विषाणूजन्य आजार पसरत आहेत. पुणे शहराला विषाणूजन्य आजारांचा विळखा घातला आहे.'एच १ एन १’ सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ झालेली आहे.तापासह खोकला, दम लागणे ही लक्षणे नागरिकांना आहेत.

पावसाळी वातावरणामुळे सध्‍या शहरात हंगामी फ्लू असलेल्‍या विषाणूजन्‍य आजारांनी डोके वर काढले. यामध्‍ये दरवर्षीप्रमाणे ‘एच १ एन १’ (स्‍वाईन फलू) सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ झाली आहे.मात्र, रुग्‍णालयात भरती होण्‍याचे प्रमाण मात्र वाढलेले नाही.

टायफाॅईड, पोटदुखी, जुलाब याचेही रुग्‍ण वाढलेले आहेत. दरम्‍यान, विषाणूजन्‍य आजारांचे प्रमाण वाढले असले तरी हे रुग्‍ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेउन बरे होत आहेत.

आजार वाढण्याची कारणे

  • हंगामी फ्लूचे वाढलेले प्रमाण, हवामानातील बदल

  • विषाणूंच्‍या वाढीसाठी पोषक असलेले वातावरण

  • एकमेकांच्‍या संपर्कात आल्‍याने होणारा संसर्ग

  • शाळांमध्‍ये आजारी मुलांपासून दुसऱ्यांना संसर्ग

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

  • सर्दी, ताप, खोकला असल्‍यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्या

  • ज्‍येष्‍ठ नागरिकांनी स्‍वाईन फ्लूची लस घ्यावी

  • गर्दीत जाताना मास्‍क वापरा

  • पावसात मुलांनी किंवा मोठ्यांनी भिजू नये

  • प्रोटीनयुक्‍त आहार जास्‍त प्रमाणात घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhopalyache Appe Recipe : भोपळ्याची नावडती भाजी होईल आवडती, झटपट नाश्त्याला बनवा खमंग आप्पे

Maharashtra Live News Update: घाटकोपर पश्चिम स्टेशन येथील शेजारी असलेल्या द मेट्रोपोल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली आग

Shehnaaz Gill: सुकून भी गुलाबी होता है...; शहनाज गीलचा नवा गुलाबी लूक पाहिलात का?

YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला

Maharashtra Politics: कोकणात राणे विरुद्ध राणे राजकीय संघर्ष? VIDEO

SCROLL FOR NEXT