Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : इमारत बांधकामावरील सळई डोक्यात पडल्याने मुलाचा मृत्यू; शाळेतून घरी जाताना घडली घटना

Pimpri Chinchwad News : इमारत मुख्य रस्त्यावर असून देखील अत्यंत कमी फ्रंट मार्जिनवर या इमारतीला परवानगी देण्यात आली आहे

गोपाल मोटघरे

पुणे : पुणे शहरातील बाणेर गणराज चौकाजवळ मुख्य मार्गालगत इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या बांधकामामुळे (Pune) एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडुन झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारा दरम्यान (Death) मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

बाणेर येथे गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या पहाडाचे काम सुरू होते. या बिल्डिंगवरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. त्या दरम्यान शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्र केतन राऊत ह्या नऊ वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यात लोखंडी सळई पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांधकामाची परवानगी रद्दची मागणी 

इमारत मुख्य रस्त्यावर असून देखील अत्यंत कमी फ्रंट मार्जिनवर या इमारतीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडते. मुख्य चौकामध्ये एवढ्या कमी फ्रंट मार्जिनमध्ये बांधकामाला परवानगी कशी देण्यात आली. तसेच बांधकामावर सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. इमारतीच्या बाबतीत अनेक त्रृटी असताना देखील पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, याची सखोल चौकशी करून बांधकाम व्यावसायिकावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत व सदर बांधकामाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT