Stray Dogs Attack On Boy: Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात कुत्र्यांची दहशत! चिमुकल्यावर हल्ला; तोंड, डोकं आणि मानेवर पडले ४० टाके

Stray Dogs Attack On Boy: पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमकुल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनकवडीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये भटक्या कत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी दोन वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यातील धनकवडी परिसरात एका चिमुकल्यावर कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुकल्याच्या तोंड, डोकं आणि मानेवर कुत्र्यांनी चावे घेतले असून त्याला ४० टाके पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील आंबेगाव पठारमधील भारती विद्यापीठ मागे असणाऱ्या चंद्रागण सोसायटी फेज -7 मध्ये ही घटना घडली आहे. एका चिमुकल्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे चिमुकला जबर जखमी झाला आहे. मुलाला किमान ४० हून अधिक टाके पडले आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

रस्त्यावरून जात असताना या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या कुत्र्यांनी चिमुकल्याच्या कपाळावर, डोळ्यावर, मानेवर आणि डोक्यावर चावे घेतले. कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याला स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या चिमुकल्यावर एका भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आंबेगाव पठार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे. हे कुत्रे लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांवर देखील हल्ले केरत आहेत. नुकताच कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केला.

या घटनेनंतर प्रायव्हेट डॉग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक कुत्र्यांना पकडून देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या परिसरामधील अनेक कुत्रे रेस्क्यू टीमने पकडले. प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT