Pune Police Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police Attack: पोलिस अधिकाऱ्यावर कोयता हल्ला प्रकरण, सोलापूरातून दोघांना अटक

API Ratnadeep Gaikwad Attack Case: सोलापूरमधील वरवड टोलनाक्याजवळ या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींवर याआधी पुण्यात अनेक ठिकाणी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Priya More

पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यावर कोयता हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी गणेश शाखेच्या पोलिसांनी आज दोन आरोपींना अटक केली. सोलापूरमधील (Solapur) वरवड टोलनाक्याजवळ या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींवर याआधी पुण्यात अनेक ठिकाणी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर या दोन्ही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते.

वानवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर रविवारी रामटेक परिसरात टोळक्याने कोयत्याने हल्ल्या केला होता. रामटेक परिसरामध्ये रविवारी टोळक्यामध्ये भांडण सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. हे भांडण सोडवण्यासाठी पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. हे भांडण सोडवत असताना त्यांच्यावर टोळक्याने कोयता हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेले पोलिस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी सर मला लवकर बरं व्हायचं आहे आणि त्यांना पकडायचे आहे, असे त्यांनी पोलिस आयुक्तांना सांगितले. पुण्याचे पोलिस आयुक्त अमित कुमार यांनी आज रुग्णालयात जाऊन रत्नदीप गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मला लवकर बरे व्हायचे असल्याचे सांगितले. त्यांच्या या जिगरबा वृत्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

SCROLL FOR NEXT