Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पोलिसांना चकवा देत आरोपी फरार; ससून रुग्णालयात दाखल असताना पलायन

Pune News : पोलिसांना चकवा देत आरोपी फरार; ससून रुग्णालयात दाखल असताना पलायन

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले होते. ससून (Pune) रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना (Police) चकवा देवून पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. (Maharashtra News)

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ललित पाटील याच्यावर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयातील वॉड क्रमांक १६ मध्ये दाखल केले होते. ललित पाटील हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कामगार रौफ रहीम शेख आणि सुभाष जानकी मंडल या दोघांच्या मदतीने मेफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करीत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरातून शेख आणि मंडल यांना शनिवारी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. 

एक्स रे काढण्यासाठी नेताना पलायन 

सदर घटनेनंतर पाटील याला सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक्स रे काढण्यासाठी नेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांना चकवा देवून त्याने पलायन केले. दरम्यान, रात्री आठ वाजता एक्स रे काढण्यासाठी नेणे आणि पोलिसांचा बंदोबस्त असताना आरोपीने पलायन कसे केले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT