Pune News
Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : रेल्वे कर्मचारी नसता तर क्षणात झाली असती राख...; थरारक घटनेचा VIDEO

साम टिव्ही ब्युरो

Shocking video : रागात किंवा नैराश्यात व्यक्ती काय करेल याचा काही नेम नसतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनावर ताबा ठेवता येणे गरजेहे आहे. मात्र नैराश्यात येऊन अनेक तरुण मंडळी आत्महत्येचे पाऊल ऊचलताना दिसतात. पुण्याती दौंड येथून अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. एक तरुण आत्महत्या करण्यासाठी थेट ट्रेनवर उभा राहून त्यावर असलेल्या विद्यूत तारांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. (Crime News)

त्या तरुणाने तारांना स्पर्श केला असता तर जागीच त्याचा मृत्यू झाला असता. मात्र रेल्वे कर्मचार्यांच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली आहे. दौंड रेल्वे स्थानकावर मालगाडीवर चढून विद्युत वाहिनीला स्पर्श करण्याची धमकी देणाऱ्या या विमनस्क तरूणास रेल्वे कर्मचार्यांनी शिताफीने खाली उतरवले.

रेल्वे स्थानकात सकाळी पावणेआठ वाजता फलाट क्रमांक पाच व दोनमधील मेन लाइनवर थांबलेल्या मालगाडीवर तरूण चढला होता. डब्यावर चढून तो त्यावरील उच्च क्षमतेच्या विद्युत वाहिनीला स्पर्श करून आत्महत्या करणार असल्याची धमकी देत होता. दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठांना देताच त्या वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

कर्मचारी त्याला खाली उतरण्याचे आवाहन करीत होते परंतु तो हात उंचावून स्पर्श करण्याची धमकी देत होता. दरम्यान एका रेल्वे कर्मचार्याने डब्यावर चढून त्याला धरले आणि दुसऱ्या बाजूने आणखी एकाने त्याला धरून खाली उतरविले. खाली उतरताच तरूणाने पळायचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले. सदर तरूण हा मध्यरात्रीपासून दौंड स्थानकावर ओरडत फिरत होता, अशी माहिती देखील समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

Pankaja Munde News: मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी गॅरंटी; पंकजा मुंडे कडाडल्या

Curry Leaves: सकाळी खा कढीपत्ता अन् आरोग्याच्या समस्या करा दूर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला! कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT