Pune Chandani chowk accident :  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Chandani chowk accident : पुण्यातील चांदणी चौकात पुन्हा भीषण अपघात; ४ वाहने एकमेकांना धडकली

Pune Chandani chowk accident News : पुण्यातील चांदणी चौकात पुन्हा भीषण अपघात झालाय. या चांदणी चौकात ४ वाहने एकमेकांना धडकली. या अपघातानंतर रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील चांदणी चौकात ४ गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. या भीषण अपघात कोणीही जखमी झालेले नाही. या अपघातानंतर चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चांदणी चौकात बुधवारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. चांदणी चौकात ४ वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. खड्ड्यांमुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात गाड्या एकमेकांना धडकल्या. अपघातात कोणीही जखमी नाही, परंतु या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

अपघात झाल्यानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर चांदणी चौकात वाहनांची लांबच लांब रांग लागली. अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र, अपघातानंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली आहे. या आधी देखील या चौकात अपघाताची घटना घडली होती. चांदणी चौकात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे प्रश्न उपस्थित होत आहे.

पंढरपूरजवळ भीषण अपघात, कंटेनरला उलटला

पंढरपूरजवळ कासेगाव येथे उजनी उजव्या कालव्यात कंटनेर उलटल्याने भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री अकरा वाजणाच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. यामध्ये चालक जखमी झाला आहे. विजापूरहून नगरकडे निघालेल्या कंटनेरचा अपघात झाला. कासेगाव येथील उजनी कालव्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटनेर तीस फूट खोल कालव्यात उलटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT