Pune pubs and bars open till 5 AM on 31st December : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यातील पब, रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. दारूची दुकानंही रात्र एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात सध्या आचारसंहिता असल्याने मद्यपीवर करडी नजर असेल. त्यामुळे नाताळ अथवा ३१ च्या पार्टीआधी दारू पिण्याचा परवाना काढावा लागणार आहे.
पुणे, मुंबईसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेय. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यात आचरसंहिता लागू असल्याने पोलिसांची तळीरामावर करडी नजर आहे. या काळात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येईल. नाताळ, ३१ डिसेंबर या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. राज्यात आचार संहितेच्या काळात पोलीस आणि भरारी पथकाची विशेष नजर असेल.
पहाटे ५ पर्यंत 31st ची पार्टी रंगणार -
२४, २५ आणि ३१ डिसेंबर या तीन दिवशी पुण्यात बार पहाटे पाच वाजेपार्यंत खुले राहतील. तर वाईन शॉपही रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांची 31st ची पार्टी जोरात होणार आहे. पुण्यामध्ये २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ पर्यंत बार, पब आणि क्लब सुरू राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा याबाबतचा आदेश जारी झालाय. विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. २ दिवस बार, पब आणि क्लब पहाटे ५ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.