Pune Daund Man Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारावर जीवघेणा हल्ला; धारदार कोयत्याने वार,पुण्यात खळबळ

Pune Daund Man Attacked News : पुण्याच्या दौंडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एक जण गंभीर जखमी आहे.

Alisha Khedekar

  • दौंड पोलीस ठाण्यासमोर भर चौकात कोयत्याने हल्ला

  • राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पराभूत उमेदवार गंभीर जखमी

  • हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

  • अद्याप हल्लेखोरांवर ठोस कारवाई नाही

  • पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

सागर आव्हाड, पुणे

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणूका अंतिम टप्प्यात आल्या असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र वादळी वातावरण पाहायला मिळालं. अशातच आता वैक्तिक कारणावरून झालेल्या वादातून, पुण्यातील दौंड पोलीस ठाणे समोरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवाराला कोयत्याने मारहाण करण्यात आली. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार आफताब सय्यद याला भर चौकात कोयता उगारून बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण वैयक्तिक कारणांवरून झाली असल्याचं समोर आलं आहे. सदर घटना दौंड पोलीस ठाण्यासमोरच घडली असून घडलेला सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या मारहाणीत आफताब सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक मोठा जमाव एका तरुणाला धक्काबुक्की करताना दिसत आहे. हा तरुण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार आफताब सय्यद आहे.

नंतर या गुंडांनी आफताबला चौकाच्या मधोमध घेऊन बेदम मारहाण केली. आफताबवर कोयता उगारल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान भर चौकात मारहाण आणि धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यावर पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दौंड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट आमने सामने, स्लिप वाटपावरून वाद

Pani Puri Recipe : घरीच बनवा बाजारात मिळतात तशा टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, रेसिपी आहे खूपच सोपी

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

SCROLL FOR NEXT