ajit pawar sharad pawar x
मुंबई/पुणे

NCP clash Pune : पुण्यात राष्ट्रवादीत राडा, शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

Bapu Pathare Lohegaon assault case : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप. लोहगाव येथील कार्यक्रमात झालेल्या झटापटीमुळे परिसरात तणावाचं वातावरण.

Akshay Badve, Namdeo Kumbhar

Sharad Pawar vs Ajit Pawar latest updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील लोहगाव भागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. आमदार बापू पठारे आणि लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सभापती बंडू खांदवे यांच्यात बाचाबाची झाली. दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे झटापटीमध्ये रूपांतर झाले. रात्री उशीरापर्यंत विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव परिसरात एका ठिकाणी माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार बापू पठारे उपस्थित होते. याच कार्यक्रमातून लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सभापती बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे आणि त्यांच्यात स्थानिक मुद्द्यांवरून शाब्दिक वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले.

लोहगाव परिसरातील रस्त्याच्या कामावरून याठिकाणी अनेक वाद येथील स्थानिक आमदार तसेच इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि याचाच एक भाग म्हणून याच भागात एक आंदोलन सुद्धा उद्या नियोजित करण्यात आले होते. बंडू शहाजी खांदवे यांना या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले, "आमचे आंदोलन हे प्रशासनाविरूद्ध होते परंतू आमदार यांनी तो विषय स्वत:वर ओढावून शाब्दिक वाद घातला. झटापटीमध्ये आमदारांच्या तीन ते चार सुरक्षारक्षकांनी माझे शर्ट फाडले व मला मारहाण केली."

दुसऱ्या बाजूला, आमदार बापू पठारे म्हणाले, "येथील रोडसाठी डिसेंबर २०२३ मध्ये ३१ कोटी रुपये मंजूर झाले होते तर २०२४ पर्यंत कोणी अडवले? रस्त्यावर पाण्याच्या लाईन नव्हत्या ड्रेनेजच्या लाईन नव्हत्या नागरिकांनी त्या जोडल्या नव्हत्या तर रस्ते करायचे कसे होते मग राजकारण म्हणून आंदोलन करायचे का मग 5 वर्षांमध्ये सत्तेमध्ये होते तेव्हा आर पी रस्ते, डीपी रस्ते का केले नाही कुणी अडवले होते. खोटं राजकारण करू नका, जनता माफ करणार नाही." या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'

भाजपात इनकमिंगचा धडाका! कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; बड्या नेत्यांची कमळाला साथ

Agricultural Land: तुमची शेतजमीन शेजारच्याकडे जास्त गेलीय? मग जमीन परत कशी मिळवणार?

शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि अजित पवार समर्थकांमध्ये दगडफेक|VIDEO

Maharashtra Live News Update: सोळा वर्षीय भाचीला मामाने ट्रेनमधून ढकललं; अल्पवयीन भाचीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT