Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Accident News : पुण्यात पुन्हा अपघाताचा थरार, ड्रायव्हर बसमधून लघुशंकेला उतरला; बस थेट भिंतीला आदळली, VIDEO

Pune Bus Accident News : पुणे येथे PMPML बस चालक नसताना अचानक पुढे सरकून चौकातील भिंतीला धडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Alisha Khedekar

नऱ्हे येथे चालक नसताना PMPML बस पुढे सरकून भिंतीला धडकली

बस ज्या मार्गाने गेली त्या मार्गात रिक्षा व दुचाकी थोडक्यात बचावले

अपघातात जीवितहानी टळली असून बसचे पुढील नुकसान झाले

नवले पुलावरील ताज्या अपघातानंतर पुण्यात हा आणखी एक मोठा प्रकार

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरात आज सकाळी बसमध्ये ड्रायव्हर नसताना अचानक बस पुढे सरकली आणि थेट चौकातील भिंतीला आदळली. सुदैवाने या बसमध्ये कोणी नसल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित हानी टळली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची बातमी ताजी असतानाच नऱ्हे येथील भैरवनाथ मंदिराजवळ आज सकाळी सुमारे अकरा वाजता पीएमपीएमएलची एक बस बस स्टॉपला उभी करून चालक आणि कंडक्टर दोघेही लघुशंकेसाठी गेले. यादरम्यान आपोआप बस पुढे सरकू लागली.

चालक बसबाहेर असताना बस पुढे सरकू लागली इतक्यात चौकातील एका भिंतीला ही बस जाऊन धडकली. बस ज्या मार्गाने पुढे सरकली त्याच मार्गात अवघ्या काही फुटावरच रिक्षा आणि एक दुचाकी देखील होती. सुदैवाने ते दोघेही थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसून बसचा पुढचा भाग काही प्रमाणात चक्काचूर झाला.

पुणे नवले पूल दुर्घटना!

पुण्यातील नवले पुलावर काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा दुरदैवी मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. या दुघटनेत एका तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. कंटेनरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुढील १० ते १५ गड्यांना धडक बसली. या घटनेनंतर नवले पूल मृत्यूचा सापळा असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

Winter Yoga Time: हिवाळ्यात योगा करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

Wednesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभाची शक्यता; वाचा बुधवारचे राशीभविष्य

या दिग्गजांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला|VIDEO

Guhagar Beach : 'गुहागर' बीचला गेल्यावर काय काय पाहावे? येथे आहे निसर्ग सौंदर्याचा खजिना

SCROLL FOR NEXT